Top News राजकारण

अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे

मुंबई | भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या मुद्द्यावरून राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीये.

2 दिवसांच्या अधिवेशनात कोणते प्रश्न सोडवणार आहात? 2 दिवसांत शोक प्रस्ताव तरी मांडता येतील का? मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधिवेशन आणि कॅबिनेटची बैठकही नकोय, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

राणे पुढे म्हणाले, “ठाकरे सरकारने बळजबरीने मराठा आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम राज्यभरात उमटतील. आणि या सर्वांना ठाकरे सरकार जबाबदार असेल.”

विरोधी पक्षाकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडू नये यासाठी हे दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं असल्याचा, आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचं त्यामागे अहमदभाई आहेत”

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाणी बील थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल

पाऊण तासानंतर Gmail, YouTube सेवा पूर्ववत

आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचं उत्तर, म्हणाला…

…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या