बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईकरांचं लक्ष लागून असलेल्या लोकल सेवेसंदर्भात त्यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्रदिनादिवशीपासून लोकल सेवा चालू होणार आहे. मात्र यासाठी नागरिकांना त्यांचे कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागलेले असतील. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून आता केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यात कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर 22 मार्च 2020 ला लोकल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 15 जून रोजी काही ठराविक प्रवाशांना लोकलद्वारे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात आली असेल तर त्वरित केंद्राला कळवा, आम्ही जनतेच्या सेवेसाठी लोकल सुरू करू, अशी रेल्वेची कायम भूमिका होती, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे पण ठाकरे सरकारने निर्णय घेण्यापुर्वी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. प्रवाशांसाठी स्मार्टफोन आणि क्युआर कोड या अटीसंबंधी बोलण्याआधी रेल्वेशी चर्चा करायला पाहिजे होती, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करून द्याचा होता तर, मग हा निर्णय फार आधी घ्यायला पाहिजे होता, असंही दानवे म्हणालेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्याची सत्यता तपासण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नाही. ही यंत्रणा राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे त्यांनी प्रवाशांची ओळख पटवावी, असंही दानवे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

चिंताजनक! आता डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना अधिक धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More