मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटला प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे हे काही वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असल्याची माहिती आहे.
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या.
राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली!
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य विभागाने केली ‘ही’ मोठी कारवाई!
“सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?, या घटनेची चौकशी झाली पाहिजे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचे मृतदेह सापडलेत- राजेश टोपे
“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”