एमआयएमसोबत युती करणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली होती. या ऑफरवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळाली. यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या युतीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
एमआयएमच्या युतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं. एमआयनएमसोबत युती होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मेहबुबा मुफ्तींसोबतच्या युतीची आठवण करु दिली. भाजपने एमआयएमच्या युतीमुळे मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान, एमआयएम भाजपची बी टीम आहे. त्यामुळे एमआयएमसोबत युती होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याचे पडसाद काय उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”
‘…तेव्हाच शिवसेनेनं हिंदुत्वाला लाथ मारली’; भाजपकडून जहरी टीका
भाजपचं हिंदुत्व फक्त राजकारणासाठी आहे – उद्धव ठाकरे
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य
“ज्या मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले त्यांनाच उद्धव ठाकरे वाचवत आहेत”
Comments are closed.