बीजिंग | कोरोनाग्रस्त वुहानमध्ये कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं चीनने जाहीर केलंय. वुहान शहराने आता कोरोनाची लढाई जिंकल्यात जमा असून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी तेथे नुकतीच भेट दिली आहे. वुहान ही हुबेई प्रांताची राजधानी असून ते कोरोनाच्या संसर्गाचं केंद्रस्थान होतं.
वुहानमध्ये आता गेल्या काही आठवडय़ांत दैनंदिन मृत व संसर्गित व्यक्तींची संख्या कमी होत असून तेथे विषाणूचा प्रसार आता थांबण्याच्या दिशेने वाटचाल आहे, असं जिनपिंग यांनी वुहान भेटीत सांगितलं होतं.
वुहानमध्ये जे उद्योग हे रोजच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आहेत ते सुरू करता येतील, असं हुबेई प्रांताच्या सरकारने म्हटलं आहे.
दरम्यान, वुहानमधील जागतिक औद्योगिक साखळ्याही परवानगी घेऊन उत्पादन सुरू करू शकणार आहेत. उर्वरित कंपन्या वीस मार्चनंतर उत्पादन सुरू करू शकतील. मध्यम आणि कमी जोखमीच्या भागात जास्त कंपन्यांना काम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देशात सध्या हिंदुत्व द्वेषाची स्तुनामीसारखी लाट आहे- असदुद्दीन ओवैसी
ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाची माहिती व्हाॅट्सअॅपवर टाकत असाल तर सावधान, तुमच्यावर होऊ शकते कारवाई
…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!
खबरदार! कोरोनाबद्दल अफवा पसरवाल तर…
Comments are closed.