Top News देश विदेश

गलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली

Photo Credit- Pixabay

नवी दिल्ली | 2020 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनचे 5 लष्करी अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पीपलस लिबरेशन आर्मीने दिली आहे.

पीपल्स लीबरेशन आर्मी हे चिनी लष्कराच अधिकृत वृत्तपत्र आहे. सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायनाने काराकोरम रांगेत तैनात असलेल्या चीनच्या सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात जून 2020 मध्ये झालेल्या झटापटीत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

मृत्यू झालेल्यांपैकी 4 जणांचा झडपेदरम्यान तर एकाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचं वृत्त प्रकाशित झालं आहे. सध्या पंगोंग सरोवर जवळून चीन आणि भारत या दोन्ही देशांनी आता आपले सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शिंजीयांग तुकडीचे रेजिमेंटल कमांडर क्युई फबाओ यांच्यासह चेन होंगुन, जियांगोंग, जियो सियुआन आणि वांग जुओरन यांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे आजपर्यंत ‘पीएलए’ या दैनिकाने पहिल्यांदाच  जवानांबद्दलची माहिती प्रकाशित करून ती जगापुढे आणली आहे.

थोडक्यात बातम्या –

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या