बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

मुंबई | स्वदेशी सामान वापरूया, चीनी मालावर बहिष्कार टाकूया असे मेसेज आपल्याला अनेकदा वाचायला मिळतात. त्यात दिवाळी म्हटलं की अगदी हमखास चीनी दिव्यांपेक्षा मातीचे दिवे वापरा असे मेसेज येतात. कोरोना काळापासून तर चीनी सामान वापरू नका, असं तर खुप बोललं जात आहे. पण असं असलं तरी यंदाची दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट पाहायला मिळत आहे.

चीनी मालावर बंदी असली तरी या दिवाळीत चीनी मालाची तब्बल 1200 ते 1500 कोटी रूपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या बाजारपेठा चीनी दिव्यांनी चमकत आहेत. गेल्या सहा सात महिन्यांपासून चीनसधून माल दाखल झाला नाही. पण तरी व्यापाऱ्यांनी आधीच साठवून ठेवलेला माल आता विक्रीसाठी बाहेर काढला आहे. व्यापाऱ्यांनी चीनी मालाचा जवळपास 50 टक्के साठा ठेवला होता आणि त्याचीच आता मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.

आपल्या देशात बनवलेल्या वस्तुंच्या तुलनेत चीनी वस्तु खुप स्वस्तात मिळतात. कमी पैसे खर्च करून अनोख्या चीनी वस्तू स्वस्तात मिळतात. त्यामुळे सहाजिकच लोकांचा ओढा हा चीनी मालांकडे जास्त असतो. चीनच्या सीमेवरील खुरापतींमुळे चीनी सामानाची आयात 80 टक्के कमी झाली असली तरी चीनमधून छुप्या मार्गाने अनेक वस्तू बाजारात दाखल होतच असतात.

मुंबईच्या लॅमिंग्टन रोडसह इतर मोठ्या बाजारपेठातील ‘चायना मार्केट’ नावाने प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रीक वस्तूंच्या दुकानात मोठ्या प्रमाणात चीनी दिव्यांची विक्री होत आहे. ‘मेड ईन चायना’ माल ग्राहकांच्या जबाबदारीवर मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. त्यामुळे स्वदेशी मालाच्या टिमक्या वाजत असल्या तरी यंदाची दिवाळीही चीनी दिव्यांनेच प्रकाशमय झालेली पाहायला मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हिंमत असेल तर त्यांनी दावा ठोकावा’, नवाब मलिकांचं समीर वानखेडेंना खुलं आव्हान

एनसीबी अधिकाऱ्याच्या ‘त्या’ लेटर बाॅम्बवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More