“षंढ सरकारची षंढ यंत्रणा, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”
मुंबई | साकीनाका घटनेनंतर महिलांबाबतच्या अत्याचाराबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना अधिवेशन घेण्यासाठी पत्र लिहिलं होतं. त्यावर उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र लिहिल होतं. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र चित्रा वाघ आणि भाजप आमदारांनी मंत्रालयासमोर जाळून निषेध केला होता.
त्यावरून आता चित्रा वाघ आणि अन्य महिला आमदारांना नोटीस आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींवर बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत.
षंढ सरकारची षंढ यंत्रणा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पहायला मिळतीये. पाच महिन्यांपुर्वी साकीनाका घटनेनंतर महिलांवरचे आणि मुलींवरचे वाढणारे बलात्कार आणि सामुहिक बलात्कार या पार्श्वभूमीवर आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती.
दरम्यान, साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी घेवून आम्ही केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणे दिलेल्या उत्तराचा आम्ही पत्र जाळून निषेध केला. गुन्हा दाखल केल्यास आम्ही घाबरत नाही. नडत राहु आणि तुम्हाला भिडत राहु, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करा, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पाहा ट्विट-
महाराष्ट्रातील महिला मुलींवर बलात्काराच्या घटना जवळपास रोज घडताहेत…साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली त्याला अतिशय निर्लज्जपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध आम्ही पत्र जाळून केला
गुन्हे दाखल केलेल्याला घाबरत नाही..
नडत राहू आणि तुम्हाला भिडत राहू…👍 pic.twitter.com/AH7LTapddg— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2022
थोडक्यात बातम्या-
“आमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाऊन परराष्ट्रीय धोरण सुधारत नाही”
रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग; युद्ध झालं तर भारताला चुकवावी लागेल ही किंमत
“सोमय्या स्वत:च्या चपलेनं स्वत:लाच मारणार, लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार”
“…तेव्हा मी आवर्जून देवेंद्रजींकडून डोसे बनवून घेतले”
“बायको हट्टला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”
Comments are closed.