“यह तो सिर्फ अंगडाई है, अब महाराष्ट्र कि बारी है”
मुंबई | पाचही राज्यांचे निकाल आता हळुहळु स्पष्ट होताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपचा (BJP) बोलबाला कायम असून गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पाच पैकी चार राज्यांत भाजपचं वर्चस्व असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Assembly Election Results 2022)
शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) देखील यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. भाजपची आघाडी आणि सेना-राष्ट्रवादीच्या पराभवावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टोलेबाजी केली आहे.
एकटा देवेंद्र काय करणार?, असा सवाल करणाऱ्यांना पुन्हा एकदा समर्पक उत्तर, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. यह तो सिर्फ अंगडाई है, अब महाराष्ट्र कि बारी है, असं सूचक वक्तव्य देखील चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलं आहे.
दरम्यान, गोवा विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा नोटाला (NOTA) जास्त मतं मिळाल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकृत साईटच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. गोव्यातील निकालावरून महाराष्ट्रात भाजपकडून शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली जात आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा पुछनेवालों को..
फिर एक बार करारा जवाब…
यह तो सिर्फ अंगडाई है….अब महाराष्ट्र कि बारी है….
जय हो…..विजय हो…💪💪@Dev_Fadnavis @CTRavi_BJP @DrPramodPSawant @ChDadaPatil @BJP4Goa @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2022
थोडक्यात बातम्या-
‘म्याँव म्याँवचा आवाज ऐकायला येत नाहीये भाई…’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं
“2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, तर जनताच….”
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं
“…अन् आता आम्ही थांबणार नाही, लोकसभाही लढू”
“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”
Comments are closed.