Loading...

राष्ट्रवादीचे नेते दुष्काळ दौऱ्यावर; पवार, सुळेंनंतर चित्रा वाघ य़ांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

सोलापुर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील दुष्काळ दौरा करत दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत.

सांगोला येथील तरंगेवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन शेतकरी आणि महिलांच्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.

Loading...

मागील आठवड्यात शरद पवारांनीही सांगोल्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न सरकारच्या कानावर घालण्याचं आश्वासन तेथील लोकांना दिलं. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी काल (बुधवारी) ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान, विरोधी पक्षांचे नेते दुष्काळ दौऱ्यावर असताना, सत्ताधारी पक्षाने देखील ‘एसी रूम’ सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, अशीच अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीसमोर गाय आल्याने अपघात; भागवत सुखरूप

-नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण नव्या वळणावर; आता तनुश्री म्हणते…

-बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

Loading...

-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

Loading...