कर्जत | लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या विटा तुमच्या काय कामाच्या? आता रामराज्य पाहिजे. माझा भाऊ विकासकामे करून मतं मागतोय… विरोधकांनी काय काम केलंय?? असा सवाल उपस्थित करत कर्जत जामखेडमधून पुन्हा राम शिंदेंना म्हणजेच विकासाला निवडून द्या, असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांनी महिला मेळावा घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तसेच विरोधकांच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता राम शिंदेंच्या कामांना डोळ्यासमोर ठेऊन त्यांना विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.
मी 20 वर्ष तिकडे (राष्ट्रवादीत) होते. त्यामुळे तिकडचं मला सगळं काही माहिती आहे. आपल्याच माणसाला आपली सुख-दु:ख कळतात. राम शिंदेंच्या कामाची उतराई म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आपलं काम आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी साधलेल्या निशाण्यावर आता रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…मग तरीही भाजपनं माझं तिकीट का कापलं असावं?- विनोद तावडे- https://t.co/vvndNspDRE #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
भाजपला घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही- शरद पवार –https://t.co/rfMYdu7S03 @PawarSpeaks @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! https://t.co/6mV1Aefslq @sangrambhaiya
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
Comments are closed.