बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ

नाशिक | पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

12 ऑडिओ क्लिपचं काय झालं? बलात्काऱ्याला सरकार का वाचवत आहे? एवढे पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केला जात नाही? ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली

आज मला शरद पवारांची आठवण होते. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवारांनी मला बोलावून घेतलं. तक्रारीची कॉपी वाचली आणि तुझा नवरा कशातच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर माझ्या पतीविरोधात केस उभी राहिली, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More