बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

मुंबई | विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनावेळी विधानसभेत झालेल्या गोंधळावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये टीका होत आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांसोबत झालेल्या बाचाबाचीमुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष भाजपला 2017 साली केलेल्या 19 आमदारांच्या निलंबनाची आठवण करून देत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे 12-19 च्या आकड्याचा खेळ वाटतोय यावरूनच कळतं की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे?, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही हे विसरलात की जनतेच चिलखत आम्ही परिधान केलंय. माका तुका हा सांगुचा हा..अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय…लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, भाजप 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत आंदोलन करत आहे. पण प्रिय देवेंद्रजी, तुम्ही त्याच विधानभवनात 22 मार्च 2017 रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करणं कसं विसरू शकता?, हिंमत दाखवा आणि सांगा की तुमचा 19 हा स्कोअर 12 पेक्षा जास्त असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावरूनच चित्रा वाघ यांनी राऊतांवर टीका केली आहे. त्यामुळे आता वाघ यांच्या टीकेला राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आश्चर्य! कोरोना लसीमुळे 9 वर्षानंतर 70 वर्षीय आजीची डोळ्यांची दृष्टी आली परत

पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जागतिक पातळीवरील नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचं नाव

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक केव्हा होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More