बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा कित्येक महिने बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तसं शाळांची घंटा पुन्हा वाजली. कित्येक महिने बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या खऱ्या पण पुण्यातील शाळांसमोर आता दुसरंच संकट उभं ठाकलं आहे. वीज बील न भरल्यामुळे पुण्यातील जवळपास 800 शाळांची वीज कापण्यात आली आहे.

वीज कापलेल्या या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. या घटनेवरून शिक्षक आणि पालकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. 800 शाळांची वीज कापल्याच्या घटनेवरून चित्रा वाघ यांनी थेट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोट्यवधी खर्चुन लॅविश घर बनवणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार आणलाय, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तर मंत्री रोषणाई झगमगाटात विद्येचं माहेरघर अंधारात असा टोलाही लगावला आहे. नितीन राऊतांनी वीजपुरवठा पुर्ववत करावा, अन्यथा सरकारला शॉक बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.

वीज बिल न भरलेल्या जवळपास 800 शाळांची वीज कापण्यात आली आहे तर महावितरणने 128 शाळांचे मीटरच काढून टाकले आहे. या शाळांचे थकित वीज बील येत्या 15 दिवसांत भरणार, अशी माहिती शिक्षण समिती अध्यक्ष रणजित शिवतारे यांनी दिली होती. पण शाळा सुरू होऊनही 800 शाळांवर वीज कापण्याची कारवाई झाल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

खळबळजनक! 10 हजार द्या अन् बोगस कोरोना रूग्ण घ्या

राज्यातील ‘या’ भागात पुढचे 4-5 दिवस विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

हजारो पुणेकरांना लसीचा एकही डोस नाही; लसीचे दोन्ही डोस कधी पूर्ण होणार?

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काही प्रमाणात वाढ, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More