‘घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के’, महामुलाखतीवरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी
मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत (Shivsena) मोठं वादळ आलं. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेत फूट पडल्याचं खापर बंडखोरांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर फोडलं.
शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा वाद रंगत असताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेतली. सामनाला दिलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी त्यांची बाजू स्पष्ट केली असून अनेक रोखठोक प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र, या मुलाखतीवरून मनसेसह भाजपनेही (BJP) टीका केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या महामुलाखतीवर बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शैलीत टीका केली आहे. काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय ती घरातल्या घरातली मुलाखत.. घरगुती कार्यक्रम एकदम ओक्के, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांसह उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तर या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही टोलेबाजी केली आहे. मी फिक्स मॅच पाहात नाही, असं म्हणत फडणवीसांनीही या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
काय ते प्रश्न..
काय ती उत्तरं..
काय ती घरातल्या घरातली मुलाखत..
कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के…@Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/MotxHb4KSV— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 26, 2022
थोडक्यात बातम्या-
“…संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी”
‘आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, मुलाखत नाही हा घरचा मामला’; मनसेची तुफान टोलेबाजी
निवडणुकांचा धुरळा उडणार; 236 प्रभागांसाठी ‘या’ दिवशी आरक्षण सोडत होणार जाहीर
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
Comments are closed.