बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!

मुंबई | परळीची असलेल्या पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. मात्र अजूनपर्यंत कोणीही थेट कोणत्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. आता मात्र भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव घेत याप्रकरणावरून त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं! एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असं आवाहन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. त्यांनी या संदर्भात काही ट्विट केले आहेत.

पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल. पोलिस अशा केसेस सुमोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

गृहमंत्री जी सध्या राज्यातील महिला अत्याचाराबाबत संजयची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधाऱ्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावंच्या भुमिकेत दिसताहेत पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईल मोठा पुरावा आहे. ज्यात तिला जीवन संपवण्यास परावृत्त करण्यापासून तर मृत्यू झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून दिल्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकलं. अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

“जनतेने मोदी सरकारला देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांनी गंभीर दखल घेत ‘त्या’ ऑडिओ क्लिप डीजींकडे पाठवल्या

इक्बाल मिर्ची प्रकरणात या नेत्याला ईडीकडून समन्स!

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More