बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणुन ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींसह भारतीयांचे आभार, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली | वेस्ट इंडिजचा तडाखेबाज बॅट्समन ख्रिस गेलने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वेस्टइंडीजच्या क्रिकेटपटूने भारतीय जनता आणि मोदींचं तोंड भरून कौतुक केलं आहे. ख्रिस गेलने आभार मानण्याचं कारण असं की, नुकताच भारताने वेस्ट इंडिजला कोरोना लसींचा डोस पाठवला आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून ख्रिस गेलने पंतप्रधान मोदींसह भारताच्या जनतेचे आभार मानले आहेत.

जमाईका येथील भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ख्रिस गेलचा आभार मानल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ‘कोरोना लस दिल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानून त्यांचं कौतुक करतो.’ असा उल्लेख करून मी लवकरच भारतात येईल असंही त्याने बोलून दाखवलं आहे. या व्हिडिओमध्ये शेवटी त्याने लसींसाठी पुनश्च एकदा खूप खूप आभार व्यक्त केले आहेत.

संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट अजूनही घोंगावत असताना भारताने इतर देशांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्यात कोणतीही कमतरता पडू दिली नाही.  8 मार्चला भारताने जमाईका येथे एस्ट्रोजेनिका लसींचे 50 हजार डोस पाठवले होते. त्यानंतर तेथील पंतप्रधानांनी गरजेच्या वेळी भारत सरकारने मदत केल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले होते.

सध्या ख्रिस गेलनेही भारताच्या पंतप्रधानांसह जनतेचं कौतुक केल्याने त्याचा हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. नेटकऱ्यांनी ख्रिस गेलच्या या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली असून सोशल मीडियावर ख्रिस गेलचं मोठ्या प्रमाणात कौतुकही केलं जात आहे.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More