बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क मांजरानं केली ‘या’ प्राण्याची शिकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही पशु-पक्षांचेही असतात. त्यातील बरेचसे व्हिडीओ एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतानाचे असल्याचं दिसुन येतं.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शिकारीचं नाव घेतलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर जंगलातील मोठं-मोठे प्राणी येतात. अनेकदा बिबट्या अनेक प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर असतात. परंतू, काय तुम्ही कधी एका मांजराला एखाद्या प्राण्याची शिकार करताना पाहिलं आहेत का? तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क मांजर एका प्राण्याची शिकार करत असल्याचं दिसून येत आहे. 

एका पुलाखाली असलेल्या नदीच्या पाण्याजवळ एक मांजर बसलेलं आहे. ते त्या ठिकाणी असलेल्या कट्यावरून त्या पाण्यात एकटक पाहत आहे. पुलावर खूप लोक दिसत असून, त्यांचा बराच गोंधळ सुरू आहे. तरीही त्या मांजराचं संपूर्ण लक्ष त्या पाण्याकडेच असल्याचं पाहायला मिळत आहे.  काही वेळानंतर एक मासा पाण्याच्या बाहेर येतो, तितक्यात दबा धरून बसलेली मांजर त्यावर झडप घालत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर मांजरानं आपल्या पायाचा आधार घेत त्या माशाला तोंडात पकडून पाण्याच्या बाहेर काढल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या मांजरीने केलेल्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओला अनेक कमेंटही येत असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Malluae.com (@malluaecom)

थोडक्यात बातम्या-

पत्नीच्या फोटोवरुन नवा वाद; इरफान म्हणतो, मी तिचा मालक नाही!

होम आयसोलेशन बंद या राज्य सरकारच्या निर्णयावर पुणे महापालिकेने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

…..म्हणून लसीकरण प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करु नका

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More