बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लखनऊ | संपुर्ण भारताने काल अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. देशाला आता स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. देशाने पंचाहत्तरी जरी पुर्ण केली असली तरी आपला देश सामाजिकदृष्या किती मागास राहिलाय, याचं एक उदाहरण काल पाहायला मिळालं. आपल्या देशातील लोकप्रतिनिधींनाच राष्ट्रगीत माहित नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संपुर्ण देशात काल झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार डाॅ. एस.टी.हसन यांना झेंडावंदनासाठी आमंत्रित करण्यात आलं. खासदार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू झाला. खासदारांनी तिरंगा फडकवला आणि झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरूवात केली.

जन गन मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता | पंजाब सिंधू गुजरात मराठा…,अशी सुरूवात खासदारांनी केली खरी, पण मध्येच त्यांना राष्ट्रगीत आठवेना. त्यानंतर त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांकडे पाहिलं. पण जसे खासदार तसे कार्यकर्ते, कार्यकर्त्यांना देखील राष्ट्रगीत पुढे म्हणता आलं नाही, त्यानंतर खासदारांनी थेट ‘जय हे, जय हे, जय हे’ सुरू केलं आणि राष्ट्रगीत संपवलं. आपलं हसू झाल्याचं कळताच खासदार कार्यक्रम उरकून घरी गेले.

दरम्यान, खासदारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. जे लोकप्रतिनिधी जनतेचं प्रतिनिधीत्व करतात. त्या लोकांनाच देशाचं राष्ट्रगीत माहित नाही. त्यांनी खासदारांना पाटी घेऊन बालवाडीत बसवावं,अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यांने केली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ”

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल!

पत्नीच्या नावावर घर खरेदी कराल तर मिळतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या अधिक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More