बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनो घाबरू नका… कोरोना बरा होतोय; उपचारानंतर डॉक्टरांनी निभावला पुन्हा रूग्णसेवेचा धर्म

मुंबई |  कोरोना झाला म्हणजे सगळं म्हणजे संपलं अशी भिती नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. मात्र ही भिती आता उतरवण्याची वेळ आली आहे. कारण उपचारानंतर मुंबईतल्या एका डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करून पुन्हा आपला रूग्ण सेवेचा धर्म निभवायला सुरूवात केली आहे.

ठाण्यातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी तात्काळ उपचार घेऊन काहीच दिवसांत कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. उपचारानंतर त्यांनी आपले 15 बेड्सचे रूग्णालय पुन्हा रूग्णांच्या सेवेकरिता सुरू केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. उपचारानंर आता कोणतीही भीती न बाळगता त्यांनी स्वत:ला पुन्हा रुग्णसेवेत झोकून दिले आहे.

दरम्यान, देशात आणि राज्यात विविध ठिकाणी आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दररोज अनेक रूग्ण कोोरनामुक्त होऊन आपापल्या घरी परत जात आहे. भारताचा तसंच महराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता चांगलाच वाढला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

कोरोना वाॅरिअर्ससाठी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात शनिवारी 107 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 53 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी

रामदास आठवलेंचा माणुसकी धर्म; ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीला दिला घरात आसरा

….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More