बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मावळ तालुक्यात पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

पुणे |  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण होणे आवश्यक आहे. कोरोनाची लस घेतल्यास विषाणूपासून होणारा त्रास कमी होत असल्याने, पवना मावळमधील ग्रामीण भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीसाठी पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात हजेरी लावत आहेत. यावेळी कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्यानंतरचा आनंद अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

पवना मावळ भागातील अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी गावागावातील लोकांना लस घेण्यासाठी रुग्णालयात घेऊन येत असल्याचे दिसून आले. याबाबत पवनानगर ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच शिवसेनेचे मावळचे उपतालुकाप्रमुख प्रमुख श्री. अमित कुंभार व जिल्हा परिषद सदस्या सौ. अलका धानिवले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी, ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळणे आवश्यक असून, लसीचा अधिक साठा इथे उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

एकीकडे कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये गैरसमजाचं वातावरण असताना, ग्रामीण भागातील नागरिकांचा हा उत्साह नक्कीच वाखण्याजोखा आहे. सर्वांनी कोरोना लस घ्यावी असं प्रशासनाकडुन वारंवार सांगण्यात येत आहे, त्यातच येथिल नागरिकांच्या आणि प्रतिनिधींच्या पुढाकारमुळे जी सकारात्मक गोष्ट घडत आहे त्याचं सर्वच स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना CBI ने बजावला समन्स

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, पाहा आकडे

दीदी तुम्हाला राग आला तर मला शिव्या घाला- नरेंद्र मोदी

मराठमोळी संगीतकार जोडी अडचणीत, ‘या’ कारणामुळे पोलिसात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More