बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांना यावर्षीही बसणार वाढीव वीजबिलाचा फटका!

मुंबई | महाराष्ट्रात गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग घेण्यात आलेलं नव्हतं. परिणामी नागरिकांना सरासरी बिल महावितरणतर्फे पाठवण्यात आलं. जानेवारी ते मार्च दरम्यान तीन महिन्यांची सरासरी काढून लॉकडाउन काळात नागरिकांना बिल देण्यात आलं.

जानेवारी ते मार्च या काळात विजेचा खप कमी झाल्याने बिलही कमी आलं पण जेव्हा लॉकडाऊननंतर महावितरणच्या कर्मचाऱ्याने रिडिंग नेली. त्यानंतर एकरकमी तीन ते चार महिन्यांचं उन्हाळा असल्यामुळे जास्तीचं बिल नागरिकांना आलं. विजेचा जास्त खप झाल्याने नागरिकांवर प्रचंड प्रमाणात आर्थिक दडपण आल्याचं पाहायला मिळालं.

सध्या मीटर रीडिंग घेण्यासाठी महावितरण ला परवानगी देण्यात आलेली आहे पण अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र असल्याने अशा ठिकाणी रीडिंग घेणं शक्य नसल्याने महावितरणने ही जबाबदारी नागरिकांवर ढकलली आहे. नागरिकांनी स्वतः ॲप किंवा वेबसाईटवर फोटो काढून रीडिंग देण्याचं आवाहन महावितरणने केलं पण या प्रणालीत ही मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

राज्यातील ग्राहकांना संक्रमित परिसरात सरासरी बिल पाठवणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच यामुळे वाढीव वीज बिलाचा शॉक नागरिकांना लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाही नागरिकांना वाढीव वीज बिलाचा आर्थिक फटका बसू शकतो.

थोडक्यात बातम्या-

कडक लॅाकडाऊन मात्र शेगावच्या लॅाजवर सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार

लायकी काढत चक्क नर्सने लगावली डाॅक्टरांच्या कानशिलात, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

“लोकांना हॅास्पिटलमध्ये बेड मिळेनात मग संघमालक, सरकार IPLवर प्रचंड पैसा का खर्च करतंय”

खेळ महत्त्वाचा नाही! 30 ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलबद्दल मोठा निर्णय

धक्कादायक! पोलिसाच्या नावे बनावट अकाऊंट उघडुन ढोंग करत मागितली ‘एवढी’ रक्कम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More