महाराष्ट्र मुंबई

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आज राज्यसभेत कसोटी!

मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडलं जाणार असून चर्चेसाठी सहा तासांचा अवधी देण्यात आला आहे. लोकसभेप्रमाणे वरिष्ठ सभागृहातही या विधेयकावर वादळी चर्चा होणं अपेक्षित आहे. तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर काल रात्री हे विधेयक लोकसभेत 311 मतांनी मंजूर झालं.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला सोमवारी शिवसेनेनंही पाठिंबा दिला होता. शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करताच काँग्रेसमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली. राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या