अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन
नारायणगाव | राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या करणाऱ्या गोडसेवर (Godse) सध्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा सिनेमा येणार आहे. त्यावरून आता राज्यभर चांगलाच वाद पेटल्याचं दिसतंय. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी तीन तरूणांनी केली होती. हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण, असं या तीन तरूणांचं नाव आहे. मात्र, कोल्हे यांनी माफी अद्याप माफी मागितली नसल्याने हे तरूण सविनय पद्धतीने उद्या अमोल कोल्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत.
अमोल कोल्हे यांनी दहशतवादी नथुरामचे उदात्तीकरण व गांधीजींची बदनामी केल्यामुळे समाजातील विविध नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. हे हीन कृत्य केल्याबद्दल कोल्हे यांनी देशाची आजवर माफी देखील मागितलेली नाही, असं या तरूणांनी म्हटलं आहे. आजारी कोल्हे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी काही पुस्तके, गांधीजींची प्रतिमा, गुलाबाची फुले कोल्हे यांना उद्या भेट असल्याचं या तरूणांनी सांगितलं आहे.
दरम्यान, उद्या प्रजासत्ताकदिनी सविनय पद्धतीने नारायणगाव येथे जाऊन हा उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपणही सर्व नथुरामचे उदात्तीकरण करणाऱ्या आजारी लोकांना गुलाबाची फुले द्या, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘देशाचं पहिलं राष्ट्रगीत’ म्हणत कंगनाने शेअर केला व्हिडीओ अन् वादाला तोंड फुटलं
‘या’ जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू; समोर आलं महत्त्वाचं कारण
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची ही 5 लक्षणं समोर; लगेच व्हा सावध!
“2024ला नरेंद्र मोदींविरूद्ध प्रियंका गांधी पंतप्रधानपदाच्या दावेदार”
Comments are closed.