Top News महाराष्ट्र मुंबई

प्रताप सरनाईकांच्या निकटवर्तीयांना अटक, मुलाची पुन्हा चौकशी

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली होती. दोन दिवसांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. चंडाळे हे प्रताप सरनाईकांचे बालपणीचे मित्र असून, ते विहंग ग्रुप ऑफ कंपनीच्या डायरेक्टरपदी आहेत.

प्रताप सरनाईक यांचा पुत्र विहंग सरनाईक यांना गुरुवारी ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची जवळजवळ पाच तास चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा- प्रताप सरनाईक

“संजय राऊतांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही”

“हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा”

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक!

“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या