Top News विधानसभा निवडणूक 2019

“मोदी आमचे वस्ताद अन् आम्ही त्यांचे चेले; मैदान कसं मारायचं आम्हाला माहितीये”

मुंबई | आखाडा तर सज्ज आहे पण पैलवान कोण? असा शाब्दिक कलगीतुरा गेले काही दिवस महाराष्ट्र अनुभवतोय. आता पंतप्रधान मोदी आमचे वस्ताद अन् आम्ही त्यांचे चेले  आहोत. मैदान कसं मारायचं हे आम्हाला चांगलंच माहितीये, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीत बोलत होते.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे खरी पण समोर पैलवानच दिसत नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर मी पैलवान संघटनेचा अध्यक्ष अध्यक्ष आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जरा माहिती घेऊन बोलावं. जर समोर पैलवान नसते तर देशाच्या पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेण्याची वेळ आली नसती, असं प्रत्युत्तर पवार यांनी दिलं.

राज्यात 370 चा प्रचार करणं योग्य आहे का? असा प्रश्न विचारल्यावर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर तो मुद्दा प्रचाराचा काय असू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान,  21 तारखेला मतदान पार पडल्यानंतर फड कोण गाजवणार आणि राजकीय कुस्तीचं मैदान कोण मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या