Loading...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली- देवेंद्र फडणवीस

बुलडाणा | भाजप सरकारनं गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बुलडाण्यात आयोजित महाजनादेश यात्रेत ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीनं १५ वर्षात शेतकऱ्यांना २० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्या सरकारनं मात्र ५ वर्षात शेतकऱ्यांना ५० हजार कोटींची कर्जमाफी थेट त्यांच्या खात्यात दिली. ५० लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला. आजही ही योजना बंद झालेली नाही, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटत नाही तोपर्यंत ही योजना सुरुच राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Loading...

शेतकऱ्यांसाठी सरकारनं केलेल्या मदतीचा पाढाच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वाचला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, दुष्काळचं, अतिवृष्टीचं, अवर्षणाचं, पीकविम्याचं, शेततळ्याचं, ट्रॅक्टरचं, विहीरीचं अनुदान दिलं, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी एवढं करुनही आमचं समाधान नाही. जोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही, त्याला सिंचनाचा लाभ मिळणार नाही, दुष्काळाच्या अवकृपेतून शेतकऱ्याला बाहेर काढत नाही,  तोपर्यंत आम्हाला समाधान नाही, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

Loading...