कोल्हापूर | सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला असून सातारा, सांगली आणि कोल्हापूर ही शहरं पाण्याखाली गेली आहेत. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उशिरा का होईना पण पूरस्थितीची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पूरस्थितीचा आढावा घेतला.
पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. नागरिकांनी घाबरू नये. कोणत्याही परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी आहे, असं शब्दही त्यांनी दिला.
दरम्यान, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यानी सांगली दौरा रद्द केला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेलं ट्विट-
Visuals of aerial survey by CM @Dev_Fadnavis and other ministers of flood affected Kolhapur, Sangli & Satara before taking review meeting and spot visits #MaharashtraFlood pic.twitter.com/24xhsbfU1m
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2019
महत्वाच्या बातम्या-
-लोक पुरात अडकलीयेत अन् शिवसेना पक्षप्रवेश करण्यात व्यस्त!
-वादग्रस्त राम कदमांना भाजपच्या वाघांचा शह!
-सांगलीतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री
-विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कार??
-जनता पाण्यात, फडणवीस प्रचारात… मुख्यमंत्र्यांना हे शोभतं का??; अजित पवार संतापले
Comments are closed.