शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!

शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!

मुंबई  | आगामी निवडणुकीत मतांचं विभाजन होऊ न देता, भाजप-शिवसेना जर एकत्र लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात बोलत होते.

राजकारणात आम्ही वेगवेगळे जरी असलो तरी आम्ही भाऊ-भाऊ आहोत. मोठा कोण आणि छोटा कोण? हे माध्यमांनी ठरवावे, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून युतीसाठी आम्ही स्वत: पुढाकार घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोण होणार अहमदनगरचा महापौर?; शिवसेनेचे रामदास कदम ठरवणार…

-लोक भाजपकडून पैसे घेतील पण मत देणार नाहीत- राज ठाकरे

-काश्मीरात रक्तपात; 7 नागरिक, 3 अतिरेकी आणि 1 जवान शहीद

-“चूक असेल तर मराठी माणसांनाही ठोकून काढेन”!

-देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमवण्याचा मार्ग; न्यायालयाच्या निकालानंतर मोदींचा हल्लाबोल

 

Google+ Linkedin