बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान कसं कळणार?”

मुंबई | एका सैनिकाला स्वतःच्या कुटुंबाची नाही तर देशवासीयांची काळजी असते. येथे जनतेची काळजी न करणारे आणि आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळणारे मुख्यमंत्री आपल्या शूर सैनिकांना पळपुटे म्हणतात, हे हास्यास्पद आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटरवरुन करण्यात आली आहे. विधानपरिषदेत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी नुकतंच ‘शेतकरी असला की खिळे आणि चीन दिसला की पळे’ असं वक्तव्य केलं होतं.

ठाकरेंच्या याच वक्तव्याचा भाजपककडून आता खरपूस शब्दात समाचार घेतला जात आहे. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी मुख्यमंत्र्यावर निषेध म्हणून शाब्दिक हल्ला चढवलेला असताना भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटरवरुनही आता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘एक सैनिक कधीही आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही, तर तो 120 कोटी जनतेला आपले कुटूंब मानून त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करतो. आपल्या आश्वासनांपासून आणि जबाबदाऱ्यांपासून पळणाऱ्या पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेले योगदान कसे कळणार?’ अशी टीका ट्वीटमधून करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील वरील ट्वीट रिट्वीट करत मुख्यमंत्र्यावरील टीकेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान आहे. चीनसमोर पळ काढला असं विधान करणं हा सैनिकांचा अपमान आहे, उणे 3 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्य चीनशी लढले, एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही, चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. मात्र अशा सैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला आहे.”

 

थोडक्यात बातम्या – 

बेन स्टोक्सला विराट भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More