“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुमच्यात हिंमत असेल तर…”
मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयामध्ये जाऊन फाईल्स चेक केल्याने बराच गोंधळ उडाला होता. किरीट सोमय्यांचा खुर्चीवर बसून फाईल चेक करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी राज्यसरकारकडून किरीट सोमय्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. अशातच आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली. त्याचा राग ते कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपिकाला तुम्ही नोटीस देताय. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा, अशी खोचक टोला किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करताय. लढाई करायची असेल तर माझ्याशी करा. त्या गरीब लिपिकाला नोटीस पाठवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना त्या लिपिकाला कुटूंबाची माफी मागावी लागणार आहे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. परंतु, मंत्रालय त्यांचे आदेश पाळत नाही, असा टोलाही सोमय्यांनी लगावला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांनी बोलतांना मुख्यमंत्र्यांना आव्हान देखील केलं आहे. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना आव्हान आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यावर एफआयआर दाखल करा. त्या गरीब लिपिकाला नोटीस पाठवतांना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
पुष्पाची क्रेझ संपता संपेना! आता ब्रावोनं केला भर मैदानात ‘पुष्पा’वर हटके डान्स, पाहा व्हिडीओ
Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच
मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका
“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”
‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Comments are closed.