बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

मुंबई | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गुलाब चक्रीवादळाचा फटका राज्यात प्रामुख्यानं मराठवाड्यात बसलेला पहायला मिळत आहे. गुलाब चक्रीवादळाचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळं मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीनं पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, या परिस्थितीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे. सोयाबीन, ऊस, कापूस आणि अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विदर्भात फिरताना आम्ही परिस्थिती पाहिली आहे. राज्यातील सर्व परिस्थिती ओल्या दुष्काळाचे संकेत आहेत. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नाना पटोलेंनी सरकारकडे केली आहे.

राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी होत आहे. शेतकरी, शेतमजूरांसह जनसामान्यांनी घाबरून जाऊ नका, सरकारकडून जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. कोणीही घाबरून जायचं कारण नाही, असं नानांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील सर्व अतिवृष्टी भागाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांकडून आज सकाळी घेतला आहे. तसेच मराठवाड्यासह राज्यातील जनतेनं धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

“शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी”

“हे तर भाजपचं षडयंत्र, कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच समजतेच कशी?”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More