बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचं सरकार येईल असा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता”

मुंबई | राज्याच्या राजकारणात कोणीही विचार केला नसेल की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील. मात्र  2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचीचं सरकार आलं.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या सरकारचे शिल्पकार ठरले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तीन पक्षाचं सरकार कधी येऊ शकेल हा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता. हे राजकीय अकल्पित घडावावं लागलं. कोरोना संकटामुळे राजकीय पक्षाचं बळ असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येत नाही. गावपातळीवर हा एकोपा करण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरूवात करता आलेली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना मनापासून काम करत आहे. भाजपसोबतही शिवसेनेनं काम केलं. आमचा युतीतून बाहेर पडण्याचा विचार नव्हता आता आघाडी झाली आहे. चांगली कामं करण्यासाठीच एकत्र यायचं आहे. मग युती असो किंवा आघाडी हा आमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तोपर्यंत आघाडी कायम राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एक कौटुंबिक नातं निर्माण झालेलं होतं. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चांगलं नातं आहे. नात्यामध्ये राजकारण का? भाजपा-शिवसेना एकत्र येणार का? याचं उत्तर शोधायचं असेल, तर भूतकाळात डोकवावं लागेल. वेगळं का व्हावं लागलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

“संघाला कोरोनापेक्षा नरेंद्र मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता”

टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी ‘हा’ देश आला पुढे; बीसीसीआय पुढे नवं आव्हान

राष्ट्राध्यक्षांचं ट्वीट डिलीट करणं ट्विटरला पडलं महागात; झाली ‘ही’ कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More