बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेकडून नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा, ‘या’ 16 जणांना मिळाली संधी

मुंबई | राज्याच्या राजकारणात नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला पक्ष म्हणजे शिवसेना… भाजपसोबत पंगा तर घेतलाच मात्र परंपरागत प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी बनवत राज्यात सत्तेचा नवा प्रयोग केला, एवढंच नव्हे तर भाजपनं जे दिलं नव्हतं ते मुख्यमंत्रिपद देखील पदरात पाडून घेतलं. याच शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्याकडे शिवसेनेने मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपसोबत बेबनाव झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्याकडे सध्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच काही नवीन नावांची देखील यामध्ये वर्णी लागली आहे.

कोणा कोणाची लागली प्रवक्तेपदी वर्णी?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार – मुख्य प्रवक्ते

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन निवड)

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन निवड)

अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन निवड)

मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन निवड)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन निवड)

डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन निवड)

किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन निवड)

संजना घाडी (नवीन निवड)

आनंद दुबे (मुंबई) (नवीन निवड)

थोडक्यात बातम्या-

मिठाच्या खड्यावरुन राजकारण तापलं; सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More