Top News महाराष्ट्र मुंबई

तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात; मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र

मुंबई |    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाविरोधात पहिल्या फळीत लढत असेलल्या कोरोनायोद्ध्यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. शस्त्राने नाही तर आपल्याला सेवेने हे युद्ध जिंकायचं आहे, असं आवाहन त्यांना केलं.

आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहित असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्र आणि मराठी मातीची परंपरा आहे. संकटकाळात महाराष्ट्र मागे हटत नाही. आज आपण सगळेच कोरोनाशी लढत आहेत, युद्ध करत आहोत. हे युद्ध सोपे नाही. या युद्धात कोविड योद्धा म्हणून आपण मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज झालात. कोरोनाची साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात यात काही शंका नाही, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

हे युद्ध आपल्याला सीमेवरील सैनिकांप्रमाणे लढावे लागेल. आपल्यासारखे कोविड योद्धे मैदानात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून आणखीनच बळ मिळाले आहे ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपुजाच आहे, असं मुख्यंंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, परिचारिका, डॉक्टर, सामान्य स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय अशा विविध क्षेत्रातून मुंबई आणि महाराष्ट्रातून सुमारे 21 हजार 552 लोकांनी कोविड योद्धे म्हणून अर्ज केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे- संजय राऊत

“आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 821 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

पुण्याच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाजपची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच- सचिन सावंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या