मुंबई | सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्यं टाळा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती.
सरकार कोणताही निर्णय घेत असेल तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा. सरकारने घेतलेल्या निर्णयावर वादग्रस्त वक्तव्य करू नका. ज्या मुद्दयाने वाद उफाळून येईल असे मुद्देही टाळण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत.
या बैठकीला राष्ट्रवादी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या 5 दिवसाचा आठवडा या निर्णयावर मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, आदरणीय पवार साहेबांनी कामकाजाबाबत केलेले मार्गदर्शन समजावून घेतले. pic.twitter.com/wiWpNu3tsr
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 17, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो- कपिल पाटील
“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”
महत्वाच्या बातम्या-
हो खरं सांगतोय; सई ताम्हणकरच आहे सविता भाभी!
इंदुरीकरांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो- कपिल पाटील
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची जोरदार चर्चा
Comments are closed.