बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 2-3 दिवस राज्यात थंडीचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | राज्यभरात हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. ऐन थंडीतही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांचे भरपूर नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच यंदा कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे.

गेल्या बऱ्यास दिवसांपासून राज्यात थंडीनं हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्‍यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत आहे.

राज्यात पुढील 2-3 दिवस थंडीचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस थंडी जोर पहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून केलं जात आहे.

दरम्यान, थंडीतही पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. राज्यात अनेक भागांत तापमान किमान 0 डिग्री झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! अजित पवारांच्या नावाने धमकीचा फोन, मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More