मुंबई | कॉमेडियन वीर दास (Vir Das) आणि कॉंट्रोव्हर्सी यांचं नातं खूप जुनं आहे. हा स्टॅन्ड अप कॉमेडियन (stand up comedian Vir Das) त्याच्या अनेक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येत असतो.
आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. देशात कोणत्याही काॅमेडियनला कधीही कानशिलात लगावली जाऊ शकते. याबाबत कोणी मारलं हे न विचारता त्याला का मारलं असं विचारलं जातं. याचा अर्थ म्हणजे कोणालाही देशद्रोह, (Treason) बदनामी आणि भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कानशिलात लगावली जाऊ शकते, अस वक्तव्य करत त्याने देशातील कायदेशीर कारवाईची खिल्ली उडवली आहे.
युुटयुबवरच्या या व्हिडीओमध्ये त्यानं भारताच्या(Of India) खाद्य संस्कृतीबद्दल ही सांगितलं आहे. तसेच त्यांना परदेशातील एका हाॅटेलबाबतचा किस्सा सांगताना यात त्याने भारतात भावना भडकवल्याच्या नावाखाली कोणालाही शिक्षा केली जाऊ शकते, असं म्हटलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रंचड व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर विर दास हा त्याच्या खास विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. वीर दासचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मध्यतरी त्यांचा मी त्या देशातून आलोय जिथे सकाळी देवीची पूजा केली जाते आणि रात्री तिच्यावर बलात्कार केला जातो, अशा आशयाच्या कवितेमुळे त्याला प्रंचड ट्रोल करण्यात आलं होतं.
थोडक्यात बातम्या
‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले
मुर्मू की सिन्हा? शिवसेना कोणाला पाठींबा देणार?, वाचा सविस्तर
‘…तर सलमान खानला जीवानिशी मारु’, लॉरेन्स बिश्र्नोईने आणखी एकदा दिली धमकी
‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य
शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ
Comments are closed.