Top News महाराष्ट्र मुंबई

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

मुंबई | राज्य सरकारने सरकारी कार्यलयात कोणते कपडे वापरायचे याबाबत निर्देश जाहीर केले आहेत. कर्मचारी कार्यालयामध्ये असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत.

त्यामुळे जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकारला प्रश्व केला आहे.

राज्य सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?, असा सवाल रामदास आठवलेंनी केला आहे.

दरम्यान, शासकीय कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

‘ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार’; फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले….

चांगली बातमी! राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”

‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या