बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 347 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 420 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 6 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,35,403 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4,744 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,028 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,12,162 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी, महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

“अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?”

भारताविरूद्ध पाकिस्तानची रणनीती! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More