बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

लंडन | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या महामारीमुळे तर सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाचं थैमान असतानाच बऱ्याच ठिकाणी मलेरियानंही डोकं वर काढायला सुरुवात केली होती. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली होती.

डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्युच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पहायला मिळाली. आता याला आटोक्यात आणण्यासाठी मलेरिया लसीला मान्यता देण्यात आली आहे. WHOनं बुधवारी RTS, S/AS01 मलेरिया लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मलेरिया लस ही डासांच्या आजारावरील पहिली लस असणार आहे. GSK फार्मा कंपनीनं ही लस विकसित केली आहे. चार डोसमध्ये ही लस देण्यात येणार आहे. मलेरियाच्या लसीमुळे बालकांच्या मृत्यू संख्येत घट होणार आहे. मलेरिया लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये चांगले आणि सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या लसीला मान्यताही मिळाली.

दरम्यान, कोरोनाच्या लसीनंतर आता मलेरियाचीही लस उपलब्ध होणार म्हटल्यावर नागरिकांची चिंताही दूर होईल आणि वाढता प्रादुर्भावालाही आळा बसेल.

थोडक्यात बातम्या – 

राज्यभरातील मंदिराचे दरवाजे उघडले पण ‘या’ 6 मंदिरासाठी मात्र कलम 144 लागू

“जेव्हा बार उघडले तेव्हा…; भवानी आणि मुंबादेवीला काय उत्तर देणार ठाकरे सरकार?”

शेवटी आईच ती! आर्यनला कोठडीत घेऊन गेली बर्गर

बापरे! सर्वसामान्यांचा ताण वाढला, गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले

अखेर मंदिरांची दारं उघडली; असा करता येणार मंदिरात प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More