Top News अहमदनगर महाराष्ट्र

‘नाद करा पण आमचा कुठं’, हेलिकॉप्टरमधून येत ‘या’ गावच्या सरपंचानं घेतली शपथ

अहमगनगर | राज्याचे मुख्यमंत्री ना मंत्रिमंडळातील कोणी मंत्र्याने घेतली नाही अशी शपथ एका सरपंचाने घेतली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळल्यानंतर गावालाच नाही तर महाराष्ट्राला लक्षात राहील अशी सरपंचपदाची शपथ संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला या गावातील जालिंदर गागरे यांनी घेतली आहे. गागरे पुण्यात रहायला असून ते प्रसिद्ध उद्योजक आहेत.

जालिंदर गागरे पुण्याचे असले तरी त्यांची गावची नाळ जोडलेली आहे. त्यांनी यंदाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीला पॅनल उभा केला आणि निवडणुक लढवली. गागरेंच्या पॅनलने यश मिळवलं. महत्वाचं म्हणजे गावच्या सरपंचपदाला पुरूषाची जागा निघाली आणि सरपंचपदाचा मान जालिंदर गागरेंना मिळाला. जालिंदर गागरेंच्या पुण्यात अनेक कंपन्या असल्याने त्यांनी गावातील अनेक तरूणांना रोजगार दिला. गागरेंच्या सरपंचपदाची शपथ ही तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. सोहळा पाहण्यासाठी गावातील लोकांनी उपस्थिती दर्शवली.

गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उपस्थित गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  ‘गावाकडे चला’ हा नारा गांधीजींनी दिला होता त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकॉप्टरनं आल्याचं जालिंदर गागरे म्हणाले.

दरम्यान, जालिंदर गागरेंनी हेलिकॉप्टरमधून गावात प्रवेश केल्यावर बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व महिलांनी आणि पुरषांनी फेटे घातले तर वृद्धांनीही गावकीचा खेळ असलेल्या लेझीम खेळावर ताल धरत गागरेंचं स्लागत मोठ्या जल्लोषात केलं.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांनी गंभीर दखल घेत ‘त्या’ ऑडिओ क्लिप डीजींकडे पाठवल्या

इक्बाल मिर्ची प्रकरणात या नेत्याला ईडीकडून समन्स!

‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार

‘दरवाजा तोड, मोबाईल ताब्यात घे’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या