महाराष्ट्र मुंबई

’20 हजार कोटी द्या’; अशोक चव्हाण यांची नितीन गडकरींकडे मागणी

मुंबई | राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी 20 हजार कोटींचा निधी दिला जावा अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्याशी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्या वतीने अशोक चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी 20 हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.

दरम्यान, राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण अनेक ठेकेदार वेळेवर काम करत नाहीत. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. जे ठेकेदार वेळेत काम करत नाहीत त्यांची कामे रद्द करावीत आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं, अशीही मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

दुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या