पुणे | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी राज्यातील राजकारण तापलेलं होतं. अशातच आता नवा वाद उद्धवला आहे. परत एकदा मोदी-नेहरू असा वाद पुण्यात रंगला आहे.
नरेंद्र मोदी पुणे महापालिकेला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत, असा दावा भाजपकडून करण्यात आल्यावर काॅंग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. पुणे महापालिकेत पंतप्रधान येण्याची ही इतिहासातली दुसरी घटना आहे, असा दावा आता काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. काॅंग्रेसचे माजी नगरसेवक विरेंद्र किराड यांनी पुणे महापालिकेला भेट देणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, असा दावा केला आहे.
1961 मध्ये रोहिदास किराड हे पुण्याचे महापौर असताना नेहरू आले होते, असं किराड म्हणाले आहेत. अशातच पंडित नेहरू पुण्यात दोनदा आल्याचा उल्लेख करण्यात येत आहे. मा. प. मंगुडकर यांच्या आठवणीतील पुणे या पुस्तकात नेहरूंच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख आहे.
दरम्यान, मोदींनी पुणे मेट्रोचा शुभारंभ केल्यानंतर पुण्यातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी व्यासपीठावर चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! एसटी महामंडळातील नोकरभरती बंद
“त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंचं तिकिट कापलं अन् मला अश्रू अनावर झाले”
“पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार”
“मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली”
नरेंद्र मोदींवर टीका करण्याची काही गरज नाही, कारण…- शरद पवार
Comments are closed.