बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाच्या युवा कार्य समितीने उदयपूर चिंतन शिबिरात 65 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्तीची शिफारस केली होती. मात्र 50 टक्के पदे तरुणांसाठी राखीव झाल्यानंतर हा प्रस्ताव तूर्तास स्थगित करण्यात आला आहे

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या स्वतः 76 वर्षांच्या आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते खर्गे यांचे वय 79 वर्षे आहे. गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी यांच्यासह अनेक नेत्याचं वय झालं आहेत, ज्यांच्यावर निवृत्तीची टांगती तलवार होती. पण, आता मात्र ते सक्रिय राजकारणात राहू शकतात.

काँग्रेसकडून नेत्यांच्या निवृत्तीचं वय ठरवलं जाणार नाही. पण, आगामी निवडणुकांमध्ये 50 टक्के जागा तरुण नेत्यांना देण्याचा निर्णय झाला आहे.

काँग्रेसमध्ये वयाच्या आधारावर निवृत्ती होणार नाही, पण कामगिरीच्या आधारावर पदावरून सक्तीची रजा दिली जाईल, असं शिबीरात ठरवलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर

इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार

मोठी बातमी! रूपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेनं दुसरा उमेदवार जाहीर करताच संभाजीराजेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

शिवसेनेचा संभाजीराजेंना जोर का झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More