देश

काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- अमित शहा

लखनऊ | काँग्रेसला राम जन्मभूमीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते लखनऊ येथे बुथ कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते.

राम जन्मभूमीचा खटला न्यायालयात सुनावणीसाठी गेला असताना राहुल गांधींच्या वकिलांनी त्यावर सुनावणी होऊ दिली नाही, त्यात अडथळा आणण्याचे प्रयत्न केले, असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारनं राम जन्मभूमी न्यासाकडील 42 एकर जमीनीचं अधिग्रहण केलं होतं, आमच्या सरकारनं ती जमीन परत देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसकडून पुण्यासाठी मोहन जोशी आणि अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस

-महाआघाडीची सत्ता आल्यास दररोज पंतप्रधान बदलला जाईल- अमित शहा

-“राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील”

-मनसे-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, वाचा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

-“नरेंद्र मोदींच्या अपयशाच्या बातम्या चीनमध्येही छापून येतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या