बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकार पडू नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत लढलेला काँग्रेसचा नायक!

बंगळुरु | कर्नाटकच्या राजकीय नाट्यात भाजपची सरशी झाली आहे. आपल्याच आमदारांनी धोका दिल्यानं काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं आहे, मात्र या सगळ्यात काँग्रेसच्या एका नेत्याची चांगलीच चर्चा आहे. डी के शिवकुमार हे ते नाव.

कर्नाटकच्या राजकीय नाट्याला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली होती. सत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या १५ आमदारांनी सरकारची साथ सोडल्यानं सरकार अल्पमतात आलं होतं.

सत्ताधाऱ्यांची साथ सोडलेले आमदार मुंबईत होते. या आमदारांची मनं वळवण्यासाठी मुंबईत येऊन शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न डी के शिवकुमार यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

काँग्रेसची साथ सोडलेले आमदार माघारी फिरकलेच नाहीत आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. यात शेवटच्या क्षणापर्यंत लढलेल्या डी. के. शिवकुमार यांची त्यामुळेच चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हा फॅक्टर पाहूनच भाजप कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा करणार???

-काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आता पुढं काय होणार???

-कर्नाटकात ‘काँग्रेस-जेडीएस’चं सरकार कोसळलं

-जगनमोहन रेड्डींनीही फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी सुबोधला मिळत होतं ‘इतकं’ मानधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More