Top News अहमदनगर महाराष्ट्र

“सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते, जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र”

अहमदनगर | भाजपकडून नेहमी महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांच्यात धुसफुस चालू असून हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचं बोललं जातं. मात्र अशातच काँग्रस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. ओबीसी जिल्हा मेळाव्यासाठी नगरमध्ये आले असताना ते बोलत होते.

राज्यातील सत्तेमध्ये समान किमान कार्यक्रमावर आम्ही एकत्र आलो आहोत. कुठेही आमच्यात मतभेद नाही आणि ते असण्याचे कारणही नाही. जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आता राजकारणात बदला घेण्याची भावना वाढली आहे. पूर्वी मतभेद होते, पण मनभेद नव्हते. आता मात्र राजकारणात मनभेद वाढले आहेत. सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते हे भाजपने लक्षात ठेवाव, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग कोणाच्या मागे लावण्यासाठी केला जात असेल तर हे योग्य नाही. ही प्रथा भविष्यात सर्वांना अडचणीची आहे. उद्या महाराष्ट्रातील लोक चिडले तर ईडीला बीडी सारखे फुकतील, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलास

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान

पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या