देश

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

नवी दिल्ली | पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं. त्यामुळे पक्षाची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. त्यासाठी आपण कामाची पद्धत बदलायला हवी, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या फाईव्ह स्टार कल्चरवरही हल्लाबोल केला. कोणतीही निवडणूक फाईव्ह स्टार कल्चरने लढवली जात नाही, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.

आज नेत्यांना तिकीट मिळताच ते फाईव्ह स्टार हॉटेल बुक करतात. जोपर्यंत पक्षातील हे फाईव्ह स्टार क्लचर बदललं जात नाही. तोपर्यंत निवडणुका जिंकता येणार नाहीत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले

लोकसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपदही मिळालेलं नाही. आज काँग्रेसची वाईट अवस्था झाली आहे. जोपर्यंत कामाच्या पद्धतीत बदल होत नाहीत. तोपर्यंत हे चित्रं बदलणार नाही, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू

“देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय पर्याय नाही”

‘मी सगळं सुरू करतो, काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?’; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या