बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विदर्भातील काँग्रेस मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या; सोमय्यांच्या रडारवर आता कोण?

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासुन राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्यांनी शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर दोन आठवड्यापुर्वी सोमय्यांनी बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. अनिल परब यांनी सोमय्यांच्या आरोपांवर कायदेशीर मार्ग काढला आहे. सोमय्यांवर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करत 72 तासात उत्तर देण्याची वकीलांमार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे.

मंत्री अनिल परब यांच्या दाव्याला मी भीक घालत नाही. शिवसेनेला वाटत असेल की मी फक्त त्यांचेच घोटाळे बाहेर काढत आहे. पण, आता माझ्या रडारवर विदर्भातील  काँग्रेसचा मंत्री आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत. राज्यात मंत्र्यांचे कोट्यावधी रूपयांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्याही मंत्र्याचा घोटाळा बाहेर येणार आहे, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

परब यांच्या वकिल सुषमा सिंग यांनी सोमय्यांना कायदेशीर नोटीस दिली आहे. त्यामुळं सोमय्यांनी आज आक्रमक होत परबांच्या दाव्यास भीक घालत नसल्याचं म्हटलं आहे. सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनीदेखील आता सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

दरम्यान, सोमय्यांनी काँग्रेसच्या विदर्भातील मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार आहे असं म्हटल्यानं, राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विदर्भात काँग्रेसचे नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकुर, सुनिल केदार हे मंत्री आहेत. या मंत्र्यापैकी आता सोमय्यांच्या रडारवर कोण येणार आहे हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

थोडक्यात बातम्या –

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी केलं असं काही की….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More